Skip to main content

Posts

Showing posts with the label मुगाच्या डाळीचे वडे

मुगाच्या डाळीचे वडे

मुगाच्या डाळीचे वडे हे रुचकर वात पित्तनाशक असतात आणि कपोवर्धक पचायला हलके ही असतात हे मुगाच्या डाळीचे वडे खाल्ल्याने शरीरात ताकद वाढते मुगाची डाळ ही पचण्यासाठी हलकीही असते तर चला तर पाहूया आपण मुगाच्या डाळीचे वडे कसे बनवायचे ते खालील प्रमाणे साहित्य मीठ 1tsp ( चवीनुसार)  मिरे,  4 ते 5 हिंग  आले मुग डाळ पाणी लाल तिखट 1 tsp एका पॅनमध्ये दोन वाटी मुगाची डाळ पाण्याने स्वच्छ धुऊन घेऊन ती एक तास पाण्यामध्ये भिजत घालावी नंतर एक तासानंतर पाण्यातून काढून घेऊन त्यामध्ये 1 टेबल स्पून मीठ  4 ते 5 काळीमिरी चिमूटभर हिंग थोडी अर्धा चमच अद्रक लसूण पेस्ट लाल तिखट 1 चमचा व त्यामध्ये थोडे पाणी हे सर्व मिश्रण मिक्सरच्या भांड्यातून काढून घेणे या मिश्रणाची बारीक पेस्ट न करता ते थोडे रव्यासारखे करून घ्यावे नंतर हे वडे करून घ्यावेत हे वडे एक दिवस उन्हामध्ये वाळून द्यावेत तुम्ही हे वडे तुपा मधून किंवा तेलामधून तळून घेऊ शकता