Skip to main content

Posts

Showing posts with the label इडली रेसिपी

इडली रेसिपी मराठी

इडली रेसिपी मराठी आज आपण सकाळी नाश्त्यासाठी झटपट बनणारी  इडली  राहणार आहोत तर त्यासाठी लागणारे साहित्य आणि कृती पुढील प्रमाणे. साहित्य : रव्याची इडली –   रवा,दही,मीठ,तेल, हिंग, आल लसूण मिरची पेस्ट,हळद,कांदा,गाजर,स्वीट कॉर्न,मटार, फरसबी,उकडलेले बटाटे,बेकिंग सोडा,लिंबाचा रस,कोथिंबीर. १ वाटी रवा मिक्सरला बारीक करून घ्यावा. एका बाऊलमध्ये एक वाटी बारीक केलेला रवा, दीड वाटी दही, चवीनुसार मीठ घालून व्यवस्थित मिक्स करून घ्यावे त्यानंतर बाउल वरती झाकण ठेवून हे बॅटर बाजूला ठेवून द्यावे. इडली स्टफिंग साठी गॅस वरती एका पॅनमध्ये २चमचे तेल घ्यावे, तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये चिमूटभर हिंग पावडर,आलं लसूण मिरची पेस्ट एक चमचा, १ चमचा हळद,१ छोटा बारीक चिरलेला कांदा घालून परतून घ्यावे, त्यामध्ये १बारीक चिरलेले गाजर,१छोटी वाटी स्वीट कॉर्न, १ छोटी वाटी मटार,२चमचे फरसबी घालून व्यवस्थित परतून घ्यावे त्यामध्ये २ उकडून बारीक केलेले बटाटे घालावे आणि हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यावे.त्यामध्ये १ चमचा बडीशोप पावडर,१ चमचा पावभाजी मसाला,१चमचा साखर, चवीनुसार मीठ घालून व्यवस्थित मिक्स करू...