इडली रेसिपी मराठी
१ वाटी रवा मिक्सरला बारीक करून घ्यावा. एका बाऊलमध्ये एक वाटी बारीक केलेला रवा, दीड वाटी दही, चवीनुसार मीठ घालून व्यवस्थित मिक्स करून घ्यावे त्यानंतर बाउल वरती झाकण ठेवून हे बॅटर बाजूला ठेवून द्यावे.
इडली स्टफिंग साठी गॅस वरती एका पॅनमध्ये २चमचे तेल घ्यावे, तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये चिमूटभर हिंग पावडर,आलं लसूण मिरची पेस्ट एक चमचा, १ चमचा हळद,१ छोटा बारीक चिरलेला कांदा घालून परतून घ्यावे, त्यामध्ये १बारीक चिरलेले गाजर,१छोटी वाटी स्वीट कॉर्न, १ छोटी वाटी मटार,२चमचे फरसबी घालून व्यवस्थित परतून घ्यावे त्यामध्ये २ उकडून बारीक केलेले बटाटे घालावे आणि हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यावे.त्यामध्ये १ चमचा बडीशोप पावडर,१ चमचा पावभाजी मसाला,१चमचा साखर, चवीनुसार मीठ घालून व्यवस्थित मिक्स करून घ्यावे. त्यानंतर गॅस बंद करावा आणि त्यामध्ये एक चमचा लिंबाचा रस आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घालावी आणि हे मिश्रण थंड करण्यासाठी ठेवावे. थंड झाल्यानंतर त्याचे छोटे छोटे गोळे करून घ्यावे.
झाकून ठेवलेले बॅटर घ्यावे आणि त्यामध्ये बेकिंग सोडा घालावा आणि व्यवस्थित मिक्स करावे. गॅस वरती स्टीमर गरम करण्यासाठी ठेवावे त्यानंतर इडलीचा साचा घ्याव त्याला थोडेसे तूप लावावे यामधे तयार केलेले थोडे बॅटर घालावे आणि त्यावरती तयार केलेला गोळा घालावा आणि हाताने थोडे प्रेस करावे आणि परत त्यावरती तयार केलेले बॅटर घालावे. अशाप्रकारे सर्व इडल्या भरून घ्याव्या आणि साच्याला थोडे टॅप करावे. स्टीमर गरम झाल्यानंतर त्यामध्ये ह्या सर्व इडल्या ठेवून द्यावा आणि स्टीमर ला झाकण लावून पंधरा ते वीस मिनिटे ठेवावे. पंधरा ते वीस मिनिटे झाल्यानंतर गॅस बंद करावे आणि स्टीमर थंड होऊ द्यावा. थंड झाल्यानंतर चाकूने सर्व इडल्या एका प्लेटमध्ये काढून घ्याव्या आणि अशाप्रकारे आपले स्टफिंग इडली तयार होते.
आपल्याला आणखी काय रेसिपी जाणून घ्यायचे असतील तर खालील बटणावरती क्लिक करा