कोबीची भाजी |
कोबीमध्ये व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असते. रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यासाठी हे फायदेशीर आहे. तसेच शरीराला लोह शोषण्यास मदत होते. रोगप्रतिकारशक्ती व्यतिरिक्त, कोबी कोलेजन वाढवण्यासाठी देखील उपयुक्त आहे. मग चला तर पाहूया कोबीची भाजी कशी बनवायची
साहित्य
- कांदा 2
- लसूण 4/5
- जिरे 1 चम्मच
- मोहरी 1 चम्मच
- हळद 1
- मटार एक छोटी वाटी
- कढीपत्ता पाच ते सहा पाने
- कोथिंबीर
- हिरवी मिरची पाच ते सात
कृती
एका कढईमध्ये दोन पळी ऑइल टाकून त्यामध्ये जिरे ,मोहरी, कढीपत्ता दोन-चार लसणाच्या पाकळ्या नंतर बारीक चिरून घेतलेला दोन कांदे टाकायचे थोडे लाल ब्राऊन कलरचे होईपर्यंत परतावेत त्यानंतर हिरवी मिरची चे बारीक केलेले तुकडे ,हळद टाकून हा पाच मिनिट परतून घ्यावे बारीक चिरून घेतलेला कोबी टाकावा व एक वाटी मटार घालावे नंतर चवीनुसार मीठ घालावे त व मंद आचेवर दहा मिनिट परतून घ्यावे गॅस बंद करावा