Skip to main content

Posts

Showing posts with the label मराठी रेसिपी

शेवयाची खीर

 खीर  खीर म्हटलं की सर्वांच्या आवडतीचा हा गोड पदार्थ हा पदार्थ भारतातील सर्व भागांमध्ये बनवला जातो चला तर पाहूया या पदार्थाची रेसिपी साहित्य शेवया 1 वाटी तूप 3   चमचे  साखर  चवीनुसार   मनुका  7,8  बदाम 4,5 काजू 2, 3  इलायची 5,6  पिस्ता 2,3  दूध 3 खोबरे कृती पहिल्यांदा कढई मध्ये  एक चमचा तूप टाकून त्यामध्ये शेवई भाजून घ्यावी नंतर कढईमध्ये तीन चमचे तूप टाकून त्यामध्ये बारीक करून घेतलेला खोबऱ्याचा कीस तीन चमचे टाकून तो थोडासा लालसर होईपर्यंत परतून घ्यावा मग नंतर ड्रायफ्रूट्स टाकून त्यामध्ये ते थोडे ब्राऊन होईपर्यंत परतून घ्यावे व नंतर दूध टाकावे दुधाला उकळी फुटल्यानंतर आपण भाजून घेतलेले शेवई त्यामध्ये टाकावी व आपल्याला किती गोड पाहिजे त्यानुसार साखर टाकावी नंतर सगळ्यात शेवटी इलायची बारीक करून टाकावी आणि ते पाच मिनिट शिजवून द्यावे आणि गॅस बंद करावा

कोबीची भाजी

कोबीची भाजी  कोबीमध्ये व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असते. रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यासाठी हे फायदेशीर आहे. तसेच शरीराला लोह शोषण्यास मदत होते. रोगप्रतिकारशक्ती व्यतिरिक्त, कोबी कोलेजन वाढवण्यासाठी देखील उपयुक्त आहे. मग चला तर पाहूया कोबीची भाजी कशी बनवायची साहित्य कांदा 2 लसूण 4/5 जिरे 1  चम्मच  मोहरी 1 चम्मच हळद 1 मटार एक छोटी वाटी कढीपत्ता पाच ते सहा पाने कोथिंबीर            हिरवी मिरची पाच ते सात कृती एका कढईमध्ये दोन पळी ऑइल टाकून त्यामध्ये जिरे ,मोहरी, कढीपत्ता दोन-चार लसणाच्या पाकळ्या नंतर बारीक चिरून घेतलेला दोन कांदे टाकायचे थोडे लाल ब्राऊन कलरचे होईपर्यंत परतावेत त्यानंतर हिरवी मिरची चे बारीक केलेले तुकडे ,हळद टाकून हा पाच मिनिट परतून घ्यावे बारीक चिरून घेतलेला कोबी टाकावा व एक वाटी मटार घालावे नंतर चवीनुसार मीठ घालावे त व मंद आचेवर दहा मिनिट परतून घ्यावे गॅस बंद करावा Fish curry

शेवग्याच्या शेंगाची भाजी

शेवग्याच्या शेंगेचे फायदे : - शेवग्याच्या शेंगेमध्ये मुबलक प्रमाणात कॅल्शियम (Calcium) असते. मुलांसाठी याचा खूपच फायदा होतो. यामुळं हाडं आणि दात मजबूत होतात.शेंगा खाल्ल्यानं गर्भवती महिलांना भरपूर कॅल्शियम मिळतं तर चला तर पाहूया आपण शेवग्याच्या शेंगाची भाजी कशी बनवायची ते खालील प्रमाणे साहित्य 1/2 किलो  शेंगा साधारण 7 ते 8 शेंगा 3  छोटे कांदे तुकडा  खोबऱ्याचा मोठा 1/2 इंच  आले 12 -15  लसूण पाकळ्या कोथिंबीर चिंच 3-4 चमचे  तेल चवीनुसार  मीठ    कृती प्रथम शेंगा  त्याचे बारीक बारीक तुकडे करून साधारण आपल्या हाताच्या बोटा सारखे तुकडे करून ते कढईमध्ये पाणी टाकून उकडून घ्यावेत नंतर मिक्सरमधून आलं अद्रक लसूण याची बारीक पेस्ट करून घ्यावी मी साधारण दोन कांदे भाजून घेऊन त्याचीही सेपरेट बारीक पेस्ट घेऊन करून घेणे नंतर कढईमध्ये दोन ते तीन चमचे तेल घालून त्यामध्ये अद्रक लसूण खोबऱ्याची पेस्ट टाकावी व ते थोडेसे लालसर होईपर्यंत परतून घ्यावे नंतर मिक्सरमधून बारीक केलेला कांद्याची पेस्ट टाकून तेही पाच मिनिट परतून घ्यावे ...

वांग्याची रस्साभाजी

वांग्याच्या वेगवेगळ्या भाज्या बनवल्या जातात बनवल्या जातात त्यामध्ये वांग्याची सुकी भाजी, रस्सा भाजी चला तर आज पाहूया वांग्याची भाजी कशी बनवायची ते खालील प्रमाण साहित्य   चार ते पाच वांगी अद्रक लसूण खोबरे शेंगदाणे काळे तिखट लाल तिखट हळद हरभरा डाळ कृती  चार ते पाच वांगी उभे चिरून घ्यावेत व त्यामध्ये शेंगदाणे काळे तिखट मीठ हळद लसुन चार ते पाच पाकळ्या टाकून ते मिक्सर मधून बारीक वाटून घेणे व ते चिरलेल्या वांग्यामध्ये भरणे नंतर अद्रक लसूण खोबरे यांची पेस्ट टाकून थोडेसे लालसर होईपर्यंत परतून घ्यावे नंतर कढई मध्ये दोन चमचे तेल टाकून त्यामध्ये भरलेली वांगी तळण्यासाठी टाकावीत ती वांगे चार ते पाच मिनिटे तळवले नंतर त्यामध्ये आपल्याला हवे हवे तेवढे पाणी टाकावे नंतर दोन चमचा हरभरा डाळ भाजून घेतलेली ती बारीक पावडर करून वांग्याच्या भाजीमध्ये थोड्याशा पाण्यात मिक्स करून टाकावे दहा मिनिटे मंदाचे वर उकळून द्यावे  नंतर गॅस बंद करावा , 

सांबर रेसिपी

सकाळच्या नाश्त्यासाठी इडली बनवायची म्हटलं की सांबर बनवावाच लागतं सांबर म्हणजे सर्व भाज्यांचे एकत्रीकरण सांबर ही भाजी आपल्याला खाण्यासाठी पौष्टिक आहे तर चला पाहूया सांबर ची रेसिपी सांबार -  तुरडाळ , टोमॅटो , कांदा , सांबार मसाला , चिंच चवीप्रमाणे मीठ लाल मिरचीपावडर - चवीप्रमाणे फोडणीसाठी तेल, हिंग, जिरे, मोहरी, कढीपत्ता, २-३ लाल सुक्या मिरच्या. कृती -   1      डाळ, टोमॅटो, १/२ कांदा कुकरला एकत्र शिजवुन घ्यावा. 2       शिजल्यावर कांदा, टोमॅटो आणि थोडी डाळ मिक्सरमधुन वाटुन घ्यावी. उरलेली डाळ घोटुन त्यात वाटलेले मिश्रण घालावे. गरजेप्रमाणे पाणी घालावे आणि एका जाड बुडच्या पातेल्यात उकळण्यासाठी ठेवावे.  3       त्यात मीठ, तिखट, सांबार मसाला, चिंचेचा कोळ घालावा. उरलेला कांदा पातळ उभा कापुन उकळत्या सांबारमधे घालावा.  4         सांबार उकळत आले की तेलात जिरे, मोहोरी, हिंग, कढिपत्ता, लाल मिरच्या घालुन फोडणी करुन त्यात ओतावी. एक उकळी आणुन गॅस बंद करावा. 👉 चिकन रेसिपी ह...

चिकन रेसिपी

चिकन म्हटलं की सर्वांच्या आवडतीचा हा पदार्थ जवळजवळ सगळ्या घरांमध्ये हा पदार्थ बनवला जातो तर चला पाहूया चिकन कसं बनवायचं ते खालील कृतीप्रमाणे प्रमाणे साहित्य      चिकन - पाव किलो असेल तर कांदा - ३ मध्यम आकाराचे,  लसणाच्या पाकळ्या - ८-१० आलं - १/२ इंच. दोन चमचे हरभरा डाळ सुकं खोबरं - ३ मोठे चमचे. लाल तिखट - २ चमचे. जीरे, तेल, हळद, मीठ - अंदाजाने लागेल तसं. कोथिंबीर - आवडीनुसार कृती   प्रथम कुकर मध्ये २ चमचे तेल टाकुन ते गरम झाल्यावर जीरं टाकावं. त्यात ४-५ लसणीच्या पाकळ्या खुप बारीक चिरुन घालाव्यात.लसुण थोडा परतला की कापलेल्या कांद्याच्या अर्धा कांदा टाकुन परतावं टोमॅटो हवा असेल तर कांदा परतला गेला की त्यात घालुन परतावं.थोडी हळद, १/२ चमचा लाल तिखट घालुन मिनिट्भर परतावं मग त्यात धुतलेलं चिकन घालुन ते मिनिट्भर परतावं. त्यात अगदी थोडं मीठ घाला.कुकरचं झाकण लावुन ३ शिट्ट्या होवु द्याव्या. कुकर गार झाल्यावर चिकन शिजलेलं असेल आणि त्यात सुप पण तयार झालं असेल. आता कढईमध्ये २-३ मोठे चमचे तेल घालुन गरम झाल्यावर जीरे घाला. खोबरं, ४-५ लसणीच्या पाकळ्या...

इडली रेसिपी मराठी

इडली रेसिपी मराठी आज आपण सकाळी नाश्त्यासाठी झटपट बनणारी  इडली  राहणार आहोत तर त्यासाठी लागणारे साहित्य आणि कृती पुढील प्रमाणे. साहित्य : रव्याची इडली –   रवा,दही,मीठ,तेल, हिंग, आल लसूण मिरची पेस्ट,हळद,कांदा,गाजर,स्वीट कॉर्न,मटार, फरसबी,उकडलेले बटाटे,बेकिंग सोडा,लिंबाचा रस,कोथिंबीर. १ वाटी रवा मिक्सरला बारीक करून घ्यावा. एका बाऊलमध्ये एक वाटी बारीक केलेला रवा, दीड वाटी दही, चवीनुसार मीठ घालून व्यवस्थित मिक्स करून घ्यावे त्यानंतर बाउल वरती झाकण ठेवून हे बॅटर बाजूला ठेवून द्यावे. इडली स्टफिंग साठी गॅस वरती एका पॅनमध्ये २चमचे तेल घ्यावे, तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये चिमूटभर हिंग पावडर,आलं लसूण मिरची पेस्ट एक चमचा, १ चमचा हळद,१ छोटा बारीक चिरलेला कांदा घालून परतून घ्यावे, त्यामध्ये १बारीक चिरलेले गाजर,१छोटी वाटी स्वीट कॉर्न, १ छोटी वाटी मटार,२चमचे फरसबी घालून व्यवस्थित परतून घ्यावे त्यामध्ये २ उकडून बारीक केलेले बटाटे घालावे आणि हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यावे.त्यामध्ये १ चमचा बडीशोप पावडर,१ चमचा पावभाजी मसाला,१चमचा साखर, चवीनुसार मीठ घालून व्यवस्थित मिक्स करू...