खीर |
खीर म्हटलं की सर्वांच्या आवडतीचा हा गोड पदार्थ हा पदार्थ भारतातील सर्व भागांमध्ये बनवला जातो चला तर पाहूया या पदार्थाची रेसिपी
साहित्य
शेवया 1 वाटी
तूप 3 चमचे
साखर चवीनुसार
मनुका 7,8
बदाम 4,5
काजू 2, 3
इलायची 5,6
पिस्ता 2,3
दूध 3
खोबरे
कृती
पहिल्यांदा कढई मध्ये एक चमचा तूप टाकून त्यामध्ये शेवई भाजून घ्यावी नंतर कढईमध्ये तीन चमचे तूप टाकून त्यामध्ये बारीक करून घेतलेला खोबऱ्याचा कीस तीन चमचे टाकून तो थोडासा लालसर होईपर्यंत परतून घ्यावा मग नंतर ड्रायफ्रूट्स टाकून त्यामध्ये ते थोडे ब्राऊन होईपर्यंत परतून घ्यावे व नंतर दूध टाकावे दुधाला उकळी फुटल्यानंतर आपण भाजून घेतलेले शेवई त्यामध्ये टाकावी व आपल्याला किती गोड पाहिजे त्यानुसार साखर टाकावी नंतर सगळ्यात शेवटी इलायची बारीक करून टाकावी आणि ते पाच मिनिट शिजवून द्यावे आणि गॅस बंद करावा