शेवग्याच्या शेंगेचे फायदे :
- शेवग्याच्या शेंगेमध्ये मुबलक प्रमाणात कॅल्शियम (Calcium) असते. मुलांसाठी याचा खूपच फायदा होतो. यामुळं हाडं आणि दात मजबूत होतात.शेंगा खाल्ल्यानं गर्भवती महिलांना भरपूर कॅल्शियम मिळतंतर चला तर पाहूया आपण शेवग्याच्या शेंगाची भाजी कशी बनवायची ते खालील प्रमाणेसाहित्य
- 1/2 किलो शेंगा साधारण 7 ते 8 शेंगा
- 3 छोटे कांदे
- तुकडा खोबऱ्याचा मोठा
- 1/2 इंच आले
- 12 -15 लसूण पाकळ्या
- कोथिंबीर
- चिंच
- 3-4 चमचे तेल
- चवीनुसार मीठ
कृती
प्रथम शेंगा त्याचे बारीक बारीक तुकडे करून साधारण आपल्या हाताच्या बोटा सारखे तुकडे करून ते कढईमध्ये पाणी टाकून उकडून घ्यावेत नंतर मिक्सरमधून आलं अद्रक लसूण याची बारीक पेस्ट करून घ्यावी मी साधारण दोन कांदे भाजून घेऊन त्याचीही सेपरेट बारीक पेस्ट घेऊन करून घेणे नंतर कढईमध्ये दोन ते तीन चमचे तेल घालून त्यामध्ये अद्रक लसूण खोबऱ्याची पेस्ट टाकावी व ते थोडेसे लालसर होईपर्यंत परतून घ्यावे नंतर मिक्सरमधून बारीक केलेला कांद्याची पेस्ट टाकून तेही पाच मिनिट परतून घ्यावे व त्यामध्ये आपल्या चवीनुसार काळे तिखट लाल तिखट हळद घालून परतावे नंतर उकडलेल्या शेंगा त्यामध्ये टाकून आपल्याला हवे तेवढे पाणी टाकावे व त्यामध्ये बारीक केलेला शेंगदाण्याचा कूट व हरभऱ्याच्या डाळीचे थोडी पावडर दोन चमचे टाकावी हे टाकल्यानंतर दहा ते पंधरा मिनिट ही भाजी उकळून द्यावी व गॅस बंद करावा