वांग्याच्या वेगवेगळ्या भाज्या बनवल्या जातात बनवल्या जातात त्यामध्ये वांग्याची सुकी भाजी, रस्सा भाजी चला तर आज पाहूया वांग्याची भाजी कशी बनवायची ते खालील प्रमाण
साहित्य
चार ते पाच वांगी अद्रक लसूण खोबरे शेंगदाणे काळे तिखट लाल तिखट हळद हरभरा डाळ
कृती
चार ते पाच वांगी उभे चिरून घ्यावेत व त्यामध्ये शेंगदाणे काळे तिखट मीठ हळद लसुन चार ते पाच पाकळ्या टाकून ते मिक्सर मधून बारीक वाटून घेणे व ते चिरलेल्या वांग्यामध्ये भरणे नंतर अद्रक लसूण खोबरे यांची पेस्ट टाकून थोडेसे लालसर होईपर्यंत परतून घ्यावे नंतर कढई मध्ये दोन चमचे तेल टाकून त्यामध्ये भरलेली वांगी तळण्यासाठी टाकावीत ती वांगे चार ते पाच मिनिटे तळवले नंतर त्यामध्ये आपल्याला हवे हवे तेवढे पाणी टाकावे नंतर दोन चमचा हरभरा डाळ भाजून घेतलेली ती बारीक पावडर करून वांग्याच्या भाजीमध्ये थोड्याशा पाण्यात मिक्स करून टाकावे दहा मिनिटे मंदाचे वर उकळून द्यावे नंतर गॅस बंद करावा
,