सकाळच्या नाश्त्यासाठी इडली बनवायची म्हटलं की सांबर बनवावाच लागतं सांबर म्हणजे सर्व भाज्यांचे एकत्रीकरण सांबर ही भाजी आपल्याला खाण्यासाठी पौष्टिक आहे तर चला पाहूया सांबर ची रेसिपी
सांबार - तुरडाळ , टोमॅटो , कांदा , सांबार मसाला , चिंच
चवीप्रमाणे मीठ
लाल मिरचीपावडर - चवीप्रमाणे
फोडणीसाठी तेल, हिंग, जिरे, मोहरी, कढीपत्ता, २-३ लाल सुक्या मिरच्या.
कृती -
1 डाळ, टोमॅटो, १/२ कांदा कुकरला एकत्र शिजवुन घ्यावा.
2 शिजल्यावर कांदा, टोमॅटो आणि थोडी डाळ मिक्सरमधुन वाटुन घ्यावी. उरलेली डाळ घोटुन त्यात वाटलेले मिश्रण घालावे. गरजेप्रमाणे पाणी घालावे आणि एका जाड बुडच्या पातेल्यात उकळण्यासाठी ठेवावे.
3 त्यात मीठ, तिखट, सांबार मसाला, चिंचेचा कोळ घालावा. उरलेला कांदा पातळ उभा कापुन उकळत्या सांबारमधे घालावा.
4 सांबार उकळत आले की तेलात जिरे, मोहोरी, हिंग, कढिपत्ता, लाल मिरच्या घालुन फोडणी करुन त्यात ओतावी. एक उकळी आणुन गॅस बंद करावा.