उडीद डाळ पापड ही उन्हाळ्यातील सगळ्यात सोपी रेसिपी उडद डाळ पापड हे जवळजवळ सर्वांचे घरांमध्ये बनवले जातात उडद डाळ पापड बनवण्यासाठी थोडीशी मेहनत तर लागणार पण ते खाण्यासाठी खूप रुचकर लागतात तर चला तर पाहूया आपण उडद डाळ पापड कसे बनवायचे ते खालील
2 कप पाणी ,
चवीनुसार मीठ
1 tsp पापडखार
1/2 tsp हिंग,
1 tsp काळी मिरी
3 कप उडीद डाळ पीठ
एका भांड्यामध्ये दिलेल्या प्रमाणानुसार पाणी घेऊन त्यामध्ये पापडखार हिंग काळीमिरी मीठ टाकून ते उकळून घ्यावे
पापड फार पाण्यामध्ये पूर्णपणे विरघळला पाहिजे याची काळजी घ्यावी
पापडखार विरघळल्यानंतर गॅस बंद करा व व ते पाणी थंड करून नंतर एका भांड्यामध्ये उडद डाळ पीठ घेऊन व ते आपण थंड करून घेतलेले पाणी ते पिठामध्ये थोडे थोडे टाकून निबर कणिक मळून घ्यावी मळून घ्यावी दोन तासासाठी ते तसेच झाकून ठेवावे नंतर हाताला थोडे तेल लावून ते छोटे छोटे त्याचे गोळे बनवून घ्यावेत लिंबापेक्षाही थोडा कमी आकाराचे गोळे बनवावे
डाळ पापड छान पातळ लाटून घ्यावेत उडीद डाळ पापड लाटताना चिकटत असतील तर पापड लाटण्यासाठी थोडेसे कोरड्या उडीद डाळ पिठाचा वापर करावा कारण ते पापड फोटो चिकटणार नाही
उडीद डाळ पापड लाटायचे झाल्यानंतर ते उन्हामध्ये 2 तास उन्हामध्ये सुखायला ठेवल्यानंतर वरून पातळ कापड टाकावे व दर अर्धा तासाला ते पलटावेत हे उडद डाळ पापड उन्हामध्ये दोन दिवस असेच सुकवावेत
चला तर तुमचे पापड खाण्यासाठी तयार झाले हे पापड तुम्ही भाजून किंवा तळून खाऊ शकता