कांदाभजी रेसिपी
भजी म्हटलं की तोंडाला पाणी येईल असा आपला पदार्थ
पावसाळ्यात तर लोक हे आवडीने पदार्थ खातात आणि तो महाराष्ट्रातील सणांच्या वेळेस तो पदार्थ हमखास बनवला जातो कांदा भजी हा सर्वांच्या घरात बनवला जातो असा पदार्थ आहे तर चला तर पाहूया भजे कसे बनवायचे
साहित्य
- उभा चिरलेला कांदा
- बेकिंग सोडा
- लाल तिखट
- हिरवी मिरची
- मीठ
- हळद
- जिरे
- कोथिंबीर
- तांदळाचे पीठ
- तेल
- बेसन
- सर्वात आधी दोन कांद्याचे उभे स्लाईस करून घेणे दोन ते तीन हिरव्या मिरच्या बारीक कट करून घेणे,
- एका भांड्यात आपल्याला लागेल तेवढे बेसन घेऊन त्यामध्ये बारीक केलेली हिरवी मिरची, चवीनुसार मीठ 1/2 ,tsp जिरे कोथिंबीर घेऊन ते मिक्सस करून घेणे ,
- भजे कुरकुरी होण्यासाठी 1 tsp तांदळाचे पीठ घेऊन बेसन मिक्स करून करून घ्यावे व त्यामध्ये चिमूटभर बेकिंग सोडा टाकून मिक्स करून घ्या
- हे मिश्रण पाच ते दहा मिनिटांसाठी साईडला ठेवून भिजून द्यावे
- नंतर कढईमध्ये तेल गरम करून घेऊन त्यामध्ये चमच्याने भजे कढाई सोडून व थोडे ब्राऊन कलर येईपर्यंत तळून घ्यावे
- भजे तळत असताना गॅस मिडीयम ठेवावा